Festival Posters

पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर हल्लबोल, जर मालेगावचे आरोपी निर्दोष होते तर..

Webdunia
शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 (08:26 IST)
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारला विचारले आहे की जर सर्व आरोपी निर्दोष होते तर २०१४ मध्ये त्यांचा खटला का रद्द करण्यात आला नाही?

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष ठरवले. या निकालावर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जर या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष होते तर २०१४ मध्ये खटला का बंद करण्यात आला नाही.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण  म्हटले आहे की जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक निर्दोष आहे तर तुम्ही २०१४ मध्ये त्यांचा खटला का रद्द केला नाही? तुम्ही न्यायालयाला का सांगितले नाही की या प्रकरणात काहीही तथ्य नाही. तुम्ही ११ वर्षे हा खटला लढला आणि आज तुम्हाला स्वप्न पडले की लोक दहशतवादी नाहीत. दोषींना शिक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्या लोकांविरुद्ध एटीएसने या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता त्याच लोकांविरुद्ध खटला चालवण्यात आला होता. जर देवेंद्र फडणवीस यांना अचानक स्वप्न पडले की हे लोक दहशतवादी घटनेत सहभागी नाहीत, तर त्यांनी हा खटला आधीच रद्द करायला हवा होता. चव्हाण म्हणाले की, या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की एनआयए पुरावे योग्यरित्या सादर करू शकले नाही, म्हणूनच या लोकांना शिक्षा झाली नाही. पण, या दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय म्हणाल? २०१४ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खटला का बंद केला नाही? असे देखील ते यावेळी म्हणाले.
ALSO READ: झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांचे ठाण्यात पोस्टर लावून मनसेने प्रतिक्रिया दिली
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, नंतर अपघाताचे खोटे नाटक रचले

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

DC vs GT: शुभमन गिलचे शानदार पुनरागमन, कर्णधार गुजरातला दिल्लीविरुद्ध २१० धावांपर्यंत पोहोचवले

एअर गनने व्यक्तीच्या गुप्तांगात हवा भरली; अंतर्गत अवयव फाटल्याने मृत्यू, आरोपीला अटक

राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार! वन्यजीवांची कातडी आणि शरीराच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणी ६ आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments