पुणे- गुन्हा केल्यानंतर अटक होऊ नये म्हणून गुन्हेगार पळून जातात परंतू एक गुन्हेगार स्वत:च्या आजरपणावर उपचार व्हावेत म्हणून फेक कॉल करुन स्वत:ला अटक करुन घेतो. जामीन न घेता जेलमध्ये राहतो अशी आश्चर्यकारक माहिती सोमर आली आहे.
अमित जगन्नाथ कांबळे, वय 30, असे या आरोपीचे नाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावे फोन करुन कोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात ठेवा असा फोन केल्याप्रकरणी पोलिसांनी कांबळेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कांबळले याने गुन्हेगारी कारवाया करण्यामागचा हेतू सांगितला. अमित कांबळे हा गेल्या चार वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त आहे. आजरावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत, परंतू गुन्हा केल्यानंतर जेलमध्ये राहता येते. आजरापणावर सरकारी खर्चाने उपचार होतात हे माहित असल्याने फेक कॉल करुन तो स्वत:ला अटक करवून घेतो अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
कांबळेवर पुण्यात अनेक गुन्हे पुण्यातील डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, हडपसर या पोलिस ठाण्यात कांबळेच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. किडनीतज्ज्ञ असल्याचे सांगून रुग्णांची लूटमार करणे, निनावी फोन करुन धमक्या देणे असे गुन्हे त्याच्यावर आहेत.