Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या 'जिल्ह्यात' भाड्याच्या घरात थेट बनावट नोटांचा कारखाना थाटला

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (09:00 IST)
हिंगोली पोलिसांनी  कारवाई करत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड केला आहे. यात पोलिसांनी १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा बनावट व २० हजार रुपयांच्या खऱ्या नोटाही जप्त केल्यात. एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात केलाय. गुप्तधन सापडले, त्यात लक्ष्मीच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्याचे सांगून बनावट मुर्ती ग्राहकांच्या माथी मारल्या जायच्या. आरोपी संतोष सुर्यवंशी याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.विशेष म्हणजे बनावट नोटा प्रकरणी यापुर्वीही अटक झाल्यानंतर आता तो जामिनावर बाहेर होता.
 
हिंगोली - ग्रामीण हद्दीत बनावट नोटा तयार करून बाजारात चलनात आणली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
 
यावेळी योगेशकुमार म्हणाले, शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आनंदनगर भागात बनावट नोटा छापण्याची गुप्त माहिती मिळाल्याने अरूण हनवते यांच्या घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम व त्याचे सोबत एक महिला व इतर साथीदार मिळुन ते बनावट नोटा छापुन प्रिंट करून स्वतः च्या फायदयासाठी त्या नोटा बाजारामध्ये चलनात आणत होता.
 
याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने उप विभागीय पोलीस अधीकारी श्री. रामेश्वर वैजने यांना मिळाली त्यानुसार सपोनि ओमकांत चिंचोळकर व पोलीस कर्मचारी रूपेश धाबे, महेश बडे, अर्जुन पड्यन, वसंत चव्हाण, आशा केंद्रे, विजय घुगे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला आणि आनंदनगर भागातील अरूण हनवते यांचे घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम नामे संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) याचे घरी छापा मारला असता १००, २००, ५००, २००० रुपये किमतीच्या नकली नोटा प्रिंट, स्कॅनिंग व झेरॉक्स अशा तिन्ही एकत्रीत सुविधा असणारी कॅनॉन कंपनीची मशिन, नकली नोटा तयार करण्यासाठीचे लागणारे सहित्य जप्त केले. 
 
तसेच महालक्ष्मी देवी यांच्या मुर्ती हया पुरातन कालीन असुन त्या सोन्याच्या असल्याचे सांगून धन सापडले असल्याचे ग्राहकांना सांगत होते. ग्राहकांना अमिष दाखवून फसवुन करण्याकरीता पिवळसर धातुच्या रंगाच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती व बनावट नोटा, १७,४७,३५० व खऱ्या नोटा २०,००० रुपये आणि मशीन व इतर नोटा बनविण्याचे इतर साहित्य १७, ९७५ रुपये प्रिंटर व एक चार चाकी कार किमत ६,४५,००० रुपये चा मुद्देमाल असा एकुण २४,३०,३२५ चा मुद्येमाल जप्त करून आरोपी संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) यास अटक करून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरुद्ध व छायाबाई गुलाबराव भुक्तार यांचे विरूध्द भादवी कलम ४८ ९ (अ), ४८ ९ (ब) , ४८ ९ (क), ४८ ९ (ड), ४८ ९ (ई), ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आधार अपडेट मोफत करा, या तारखेपर्यंत कोणतेही शुल्क लागणार नाही

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार होणार,शपथ घेणाऱ्या नेत्यांची यादी पहा

भाजपच्या माधुरी मिसाळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ, स्वतः दिली ही माहिती

2 वर्षाच्या मुलाने चुकून आपल्या आईला गोळी मारली, आईचा मृत्यु प्रियकराला अटक

मुंबईतील वरळी परिसरातील पूनम चेंबर्सला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

पुढील लेख
Show comments