rashifal-2026

कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर पुराचे २७ बळी

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (10:20 IST)
पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर पाच जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे २७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील तब्बल दोन लाख जणांना सुक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही सर्व माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
 
प्रशासनाकडून सुरू असलेले बचावकार्य हे पुरात अडकलेल्या अनेकजणांपर्यंत पोहचले नाही हे उघड होत आहे. अजूनही शेकडोजण आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. तर सरकारकडून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही  त्यांनी सांगितले आहे.
 
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी परवानगी दिली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली अभूतपूर्ण पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उदयपूरमध्ये चालत्या कारमध्ये महिला मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

गुजरातला भीषण भूकंपाचा धक्का

प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पक्षात येण्याची कारणे सांगितली

आमदार देवयानी फरांदे यांनी भाजप कार्यकर्त्यांवरील अन्यायाबद्दल नाराजी वक्त केली

पुढील लेख
Show comments