Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार,आज या ठिकाणी पावसाचा अलर्ट

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:37 IST)
सोमवार पासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ भागात पावसाने जोरदार आगमन केले आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आज बुधवारी अनेक जिल्ह्यांत मेघसरी बरसणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  
 
 राज्यातील विविध भागात पुढील तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटांसह पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.  

सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पत्ता बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. रायलसीमा आणि परिसरावर 900 मीटर उंचावर चक्राकार वाऱ्याची स्थिती बनली आहे. या कारणामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

आज सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, सांगली, पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, अहमदनगर, पुणे, आणि सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आज जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, परभणी पावसाचे पावसाचाआगमन होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 
वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments