Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात मृत्यूचा पाऊस: आतापर्यंत 112 लोकांचा मृत्यू, 99 अद्याप बेपत्ता; 1.35 लाख लोकांना घरे सोडून जावे लागले

Webdunia
रविवार, 25 जुलै 2021 (16:30 IST)
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे सुमारे 112 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 99 अद्याप बेपत्ता आहेत. शनिवारी रात्री ही माहिती देताना मदत व पुनर्वसन विभागाने सांगितले की,मलबेमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे.राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 1 लाख 35 हजार लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे.
 
मदत व पुनर्वसन विभाग म्हणाले, 24 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंत पूरग्रस्तांमधून 1.35 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. 112 लोकांचा जीव गेला आहे आणि 3221 प्राणी देखील मरण पावले आहेत. 53 लोक जखमी झाले आहेत आणि 99अद्याप बेपत्ता आहेत.”सांगली आणि रायगड यासारख्या जिल्ह्यात अति पावसामुळे दरडी कोसळल्या आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.रस्ते आणि शेतात सर्वत्र फक्त पाणी आहे. पाण्याची पातळी वाढत असताना स्थानिक लोक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आणि लोकांना जागरूक करत आहेत. 
 
स्थानिक युवक म्हणाले,“परिस्थिती चांगली नाही. पाणी आता समडोलीकडे जात आहे. बर्‍याच मोटारीही अडकून पडल्या आहेत. "पाणीपातळीवर लक्ष ठेवणारे आणखी एक ग्रामस्थ म्हणाले," आम्ही इथे बसलो आहोत आणि पुराचे पाणी समडोलीत प्रवेश तर करत नाही हे पाहत आहोत. पाणी वाढल्यास आमचा दैनंदिन मार्ग बंद होईल."सांगली जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याखाली गेल्याने जवळपासच्या गावातील लोकांनी समडोलीमध्ये आश्रय घेतला आहे. 
 
यापूर्वी शनिवारी एनडीआरएफने सांगितले की, महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांत बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफने सांगितले की मुंबई,ठाणे,रत्नागिरी,पालघर,रायगड,सांगली, सिंधुदुर्ग नगर आणि कोल्हापुरात 26 संघ बचावकार्यात गुंतले आहेत. कोलकाता आणि वडोदरा येथून आणखी 8 संघांना विमानाने बोलावून घेतले आहेत..
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments