Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन

Rainy convention in Mumbai from 18th July१८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन Maharashtra Regional News In Webdunia Marathi
Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (08:19 IST)
महाराष्ट्र  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीता ने संस्थगित करण्यात आले. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पीय  अधिवेशन संस्थगित होत असल्याचे सांगत पुढील अधिवेशन सोमवार दि. १८  जुलैपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा केली.
 
विधानपरिषदेचे कामकाज :- सभागृहात १५ बैठका पार पडल्या.प्रत्यक्षात ८८ तास ३७ मिनिटे कामकाज पार पडले. रोजचे सरासरी कामकाज ५ तास ५३ मिनिटे पार पडले. एकूण १७५५ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यापैकी ७७५ प्रश्न स्विकृत होते.११३ तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. अतारांकित प्रश्न १२२ उपस्थित करण्यात आले.अल्पसूचना ५ प्राप्त झाल्या. नियम ९३ अन्वये एकूण ८० सूचना करण्यात आल्या. सभागृहाच्या पटलावर एकूण १९ निवदने ठेवण्यात आली. औचित्याचे एकूण १०६ मुद्दे उपस्थित करण्यात आले.विशेष उल्लेख २५४ प्राप्त सूचना होत्या. नियम ४६ अन्वये २ निवेदने होती.
 
शासकीय विधेयके :- विधानपरिषद  विधेयक पुर:स्थापिक २, यामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके २, विधानसभा विधेयकामध्ये पारित करण्यात आलेली विधेयके ११ होते, विधानसभेकडे शिफारशीशवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके ४ होती.नियम २६० अन्वये एकूण ४ प्रस्ताव प्राप्त होते.अशासकीय ठराव ११०,अंतिम आठवडा प्रस्तावाची संख्या १ होती. सदस्यांची  अधिवेशनाला ९२.८५ टक्के उपस्थिती होती. एकूण सरासरी उपस्थिती ८५.७१ टक्के होती.
 
 विधानसभा कामकाज :- एकूण १५ बैठका पार पडल्या असून या काळात सभागृहाचे रोज सरासरी कामकाज ७ तास १० मिनिटे चालले. एकूण ६६९८ इतके प्रश्न तारांकित प्राप्त होते. त्यापैकी ६९६ प्रश्न स्वीकृत असलेल्या प्रश्नांपैकी सभागृहात ६४ प्रश्न उपस्थित करण्यात आले. ३ अल्पसूचना  प्राप्त  होत्या. एकूण १७८७ लक्षवेधी सूचना प्राप्त होत्या. त्यापैकी स्विकृत २७४ होत्या. यामध्ये८०  लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाल्या. नियम ९७ च्या एकूण ६८ सूचना प्राप्त होत्या.
 
शासकीय विधेयके :- विधानसभा विधेयक पुर:स्थापिक १३, यामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके १५, विधानपरिषद विधेयकामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके १ होते, नियम २९३ अन्वये एक सूचना प्राप्त होती, त्यावरती चर्चा पार पडली. प्रश्न- उत्तरातून ७३ सूचना प्राप्त होत्या. यामध्ये ६३ सूचना स्विकृत होत्या, त्यापैकी ६ विषयांवर चर्चा झाली. सदस्यांची  अधिवेशनाला ९१.५३ टक्के उपस्थिती होती.एकूण सरासरी उपस्थिती ८४.३८ टक्के होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments