Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे केले राज ठाकरेंनी शिवसैनिकांना हस्तांदोलन

Webdunia
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:39 IST)
दसऱ्यानिमित्त पार पडलेल्या  मेळाव्यानंतर शिवसैनिक घरी परतत होते. त्यावेळी काही शिवसैनिक शिवतीर्थाच्या बाजूलाच राहणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेरुन जात होते.  राज ठाकरे तळमजल्यावर काचेच्या खोलीत काहीतरी लेखन करत बसले होते. त्यावेळी बाहेरुन जाणाऱ्या शिवसैनिकांना राज ठाकरे दिसले आणि ते थांबले.
 

या शिवसैनिकांनी राज ठाकरेंना कंपाऊंडबाहेरुनच हाका मारण्यास सुरुवात केली. ‘राजसाहेब बाहेर या’ अशा घोषणा सुरु झाल्या. तिथे सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना गप्प करण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांना राज ठाकरेंना उद्देशून  घोषणा सुरुच ठेवल्या.

राज ठाकरेंनी सुरुवातीला हाका मारणाऱ्या शिवसैनिकांना आतूनच अभिवादन केलं. मात्र शिवसैनिक घोषणा देण्याचे काही थांबत नव्हते. मग अखेर राज ठाकरे स्वत: बाहेर आले आणि त्यांनी तिथे जमलेल्या शिवसैनिकांना हस्तांदोलन केले.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments