Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Raj Thackeray राज ठाकरेंचा कोकण दौरा जाहीर

raj thackeray
, सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (14:34 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 1 ते 9 डिसेंबरदरम्यान कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
मनसेकडून राज यांच्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्ष बळकटीसाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.
विदर्भ दौऱ्यानंतर आता ते 1 डिसेंबरपासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
कोकण दौऱ्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन बळकट करण्यासाठी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कोकण दौरा जाहीर करत असतानाच राज ठाकरेंनी वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होत आहे. या बैठकीत राज ठाकरे मुंबईतील लोकसभानिहाय परिस्थितीचा घेणार आढावा आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजीनामा देऊ नका,अजित पवारांचे जितेंद्र आव्हाडांना आवाहन