suvichar

राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे : संजय राऊत

Webdunia
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेलं कार्य दिसेल” असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
 
“अयोध्येत आपलं दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेलं पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.
 
“गेल्या दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झालं, त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसतय” असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

फेक न्यूज पसरवणाऱ्यांना आता चाप! महाराष्ट्र सरकार आणतंय नवा कठोर कायदा

LIVE: फेक न्यूज पसरवणाऱ्यांना आता चाप! महाराष्ट्र सरकार आणतंय नवा कठोर कायदा

बंगालमध्ये 'कमळ' राज: ५ मंत्र्यांसह शुभेंदु अधिकारींनी घेतली शपथ, मोदींच्या रोड शोने दणाणली कोलकाता!

संजय राऊतांनी चक्क केलं भाजपचं अभिनंदन! नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात अनेक भागांत पारा ४० अंशांच्या वर पोहोचला; राज्यावर उष्णतेची लाट आणि धुळीच्या वादळाचे दुहेरी संकट

पुढील लेख
Show comments