Festival Posters

विरोधादरम्यान रामगिरी महाराजांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- कुणालाही खेद व्यक्त करायचा नाही

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (10:59 IST)
सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माबाबत दिलेल्या विधानावरून महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये गदारोळ आणि निदर्शने सुरू आहेत. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ पुढे आलेले आमदार नीतेश राणे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच अशा वेळी रामगिरी महाराजांनी स्वतः पुढे येऊन प्रश्नांची उत्तरे दिली आहे. आपल्या वक्तव्याबद्दल आपल्याला कोणतीही खंत व्यक्त करायची नाही, असे ते म्हणाले आहे.
 
मी जे विधान केले आहे ते कोणत्या तरी शास्त्राच्या आधारे दिले असल्याचे रामगिरी महाराज म्हणाले. तो इतिहास आहे आणि इतिहास बदलता येत नाही. सत्य समोर आणणे हे आमचे काम आहे. मी जे बोललो ते सत्य आहे आणि बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगताना मी उदाहरण म्हणून त्या गोष्टी बोलल्या होतो, असे ते म्हणाले. रामगिरी महाराज म्हणाले की, हा देश संविधानाने चालवला असून संविधानात आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ज्याने एफआयआर दाखल केला आहे त्यांनी तसे केले आहे पण एफआयआरबाबत पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला नाही.
 
तसेच माझ्या विधानामुळे एवढा गदारोळ होईल याची मला कल्पनाही नव्हती आणि असे का होत आहे हेही मला माहीत नाही, असे रामगिरी महाराज म्हणाले आहे. बांगलादेशात महिलांवर बलात्कार का होत आहे? असा प्रश्न त्यांनी केला. मनात जे आलं ते बोललो. मी काही वादग्रस्त बोललो असे मला वाटत नाही. बांगलादेशात हिंदूंचा छळ करणारे लोक कोण आहेत? ते इस्लाम धर्माचे लोक आहेत आणि हे सर्वांना दिसत आहे.
 
नितीश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नितीश राणे जे बोलले, त्या जनतेच्या भावना व्यक्त होत आहेत. मला त्यात काही म्हणायचे नाही. नितीश राणेंनी दिलेल्या वक्तव्याची गरज नसून हा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असे ते म्हणाले. प्रसिद्धीसाठी लोक आमचा विरोध करत असल्याचे ते म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अशोक खरात यांच्या मुलानंतर आता त्यांच्या मुलीची चौकशी सुरू आहे; त्यांची पत्नी अद्याप फरार

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी अंतिम इशारा दिला, यावेळी मुदतवाढ दिली जाणार नाही

बारामती पोटनिवडणुकीपूर्वी संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या; म्हणाले....

बुलढाण्यात अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू

LIVE: शरद पवार म्हणाले अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको

पुढील लेख
Show comments