Dharma Sangrah

विधिमंडळातर्फे स्व. वसंतराव डावखरे यांचा स्मृतिग्रंथ बनवावा - रामराजे नाईक निंबाळकर

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (16:22 IST)

स्व. वसंतराव डावखरे हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील योगदान मोलाचे आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिमंडळाने स्मृतिग्रंथ तयार करावा, अशी मागणी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. वसंतराव डावखरे यांच्या शोकसभेचे आयोजन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी निंबाळकर यांच्या मागणीला दुजोरा दिला. यावेळी खा. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिक्षणमंत्री 
विनोद तावडे  कपील पाटील, भाजपचे भाई गिरकर, खा. रामदास आठवले, आ. निलम गोऱ्हे, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासच्या कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, जेष्ठ नेते पद्यमसिंह पाटील, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर नाईक, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. निरंजन डावखरे, आ. भाई जगताप, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे, खा. माजिद मेमन उपस्थिती होती.

 

ठाण्यातील सार्वजनिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात वसंत डावखरे यांचा उल्लेख कायम राहील. त्यांनी शेवटपर्यंत सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचे काम केले. असा उत्कृष्ट संसदपटू, लोकांशी समरस होणारा नेता आज आपण गमावला आहे अशा शब्दात शरद पवार यांनी स्व. वसंत डावखरे यांना श्रद्धांजली वाहिली. तर जनतेप्रती वसंत डावखरे यांचे असलेलं प्रेम ठाणेकरांनी अनुभवलं आहे. ठाणे शहराचे महापौरपद भूषवत असताना त्यांनी नेहमी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील 'वसंत'पर्व हरपले असे म्हणत त्यांनी आदरांजली वाहिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

10th results कमी गुणांमुळे तणावाखाली येऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या; धाराशिव मधील घटना

पुण्यात पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्या वरून उडी घेऊन पत्नीची आत्महत्या

LIVE: सुप्रिया सुळे यांच्या गाडीला भरधाव वेगाच्या वाहनाने धडक दिली

मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांसाठी भाजपची मराठी शाळा, विशेष दोन पानी माहितीपुस्तिकेचे वाटप

"माझ्या कामाचा ९० टक्के भाग समाजसेवा आहे, त्यामुळे मला प्रचार करण्याची गरज वाटत नाही,"- नितीन गडकरी

पुढील लेख
Show comments