Festival Posters

राज्यातील मनपा, जिप निवडणुकांत भाजपा सर्वाधिक जागा जिंकेल – प्रदेशाध्यक्ष दानवे

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (10:58 IST)
राज्यातील जिल्हा परिषदा , पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला.  मखमलाबाद येथील मराठा मंगल कार्यालयात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खा.दानवे बोलत होते. व्यासपिठावर प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जेष्ठ नेते विजय साने, माजी खाजदार प्रतापदादा सोनवणे , प्रशांत जाधव, काशिनाथ शिलेदार, पवन भगुरकर, रोहिणी नायडु, संजय गालफाडे, सुनिल देसाई, भगवान काकड, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील, शाम पिंपरकर, पुंडलिक खोडे, भिकुबाई बागुल,अजित ताडगे, दामोदर मानकर, सुनिता पिंगळे, संजय बागुल आदी होते.
 
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाच्या विरुध्द सारे पक्ष अशी लढाई आहे.  महाराष्ट्राच्या सर्व भागांचा मी दौरा केला असता सर्वत्र भाजपाला अनुकूल वातवरण असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. भाजपाला चांगले यश मिळेल असे भाकित आम्ही केले तेव्हा  आमच्या विरोधकांना ही बाब रुचली नव्हती. परंतु सर्वात जास्त म्हणजे 80 नगराध्यक्ष आमचे निवडून आले. या आधी ही संख्या फक्त आठ  होती. तसेच भाजपाचे 1207 नगरसेवक निवडून आले. याआधी हि संख्या 240 होती. दोन ते अडीच वर्षांत भाजपाने यशाचे हे शिखर गाठले आहे. आमचा पक्ष वाढत असल्यानेच विरोधक आमच्यावर तुटून पडत आहेत व अफवा पसरविण्याचे काम त्यांच्यातर्फे सुरू आहे. आमच्यावर जातीयवादी म्हणूनही आरोप केले जात आहेत. शिवसेनेशी आम्ही युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती झाली नाही. त्यांनी आमच्याशी काडीमोड घेतला असेही दानवे पुढे म्हणाले. या आधीच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही म्हणून 125 कोटी जनतेने त्या सरकारला खाली खेचले. मात्र भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे. आम्ही आणेवारी काढण्याची पद्धत बदलली.  पिकांचे 33 टक्के  नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. पीक विम्याच्या निकषातही बदल केले, असे ही दानवे यांनी निदर्शनास आणले.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात TMS 2.0 लाँच केले

'SIR 2' साठी भाजप महाराष्ट्राने केली विशेष तयारी, प्रतिनिधींची यादी जाहीर

मुंबई: धारावी येथे छाप्यात लाखो रुपयांची औषधे जप्त

LIVE: एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हनुमंत जगदाळे यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत होता

पुढील लेख
Show comments