rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दानवेंनी महावितरणचे अडीच लाखांचे बिल थकवले

rao saheb danve
, सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:12 IST)

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची महावितरणचं तब्बल अडीच लाखांचं वीजबिल थकवलं आहे. दानवेंचं भोकरदनमधील घराचं गेल्या 83 महिन्यांपासूनचं वीजबिल थकलेलं आहे. मात्र  अद्याप महावितरणकडून  दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचं तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचं वीजबिल दानवेंनी थकवलं आहे. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी आहे.

सर्वसामान्यांनी वीजबिल भरण्यास थोडा उशीर केल्यास महावितरण तातडीनं वीजेचं कनेक्शन कापते. मात्र 83 महिन्यांपासून दानवेंची लाखोंची थकबाकी असूनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे महावितरणच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुकाणू समितीचा इशारा, 15 ऑगस्टला ध्वजारोहण करु देणार नाही