Marathi Biodata Maker

कोल्हापूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा संविधान बचावचा नारा

Webdunia
गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (08:45 IST)
- महिला पदाधिकाऱ्यांवर धावून आले पोलिस
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात संविधान बचाव मोहीम छेडली आहे. आज कोल्हापुरात या अभियानाची जनजागृती करण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करत मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर प्रचंड दडपशाही केली. पोलीस चक्क महिला पदाधिकाऱ्यांवर धावून जाताना दिसले.
 
सरकार मनुस्मृती आणि मनुविचारांचे संरक्षण करत आहे. या सरकारला संविधान नको तर मनुस्मृती हवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी दिली. हे सरकार मनुवादी असून संविधानविरोधी आहे. या सरकारला सत्तेतून घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार विद्या चव्हाण यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीसांनी डिजिटल अटकेबद्दल जागरूकता वाढवली; म्हणाले-फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉल आला तर.....

कल्याण : भटक्या कुत्र्याने चावल्यामुळे बँक कर्मचारीची गळफास घेऊन आत्महत्या

Veer Savarkar Punyatithi 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी भाषण

राष्ट्रपती महाराष्ट्रात येणार, ४ दिवसांच्या बहु-राज्य दौऱ्याचा भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उद्घाटन करणार

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे इंडोनेशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

पुढील लेख
Show comments