Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ratnagiri : कॉलेजचा कंटाळा म्हणून तरुणाची आत्महत्या

Webdunia
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (11:41 IST)
आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याला जपून ठेवावं.असं म्हटलं जात पण अलीकडे नैराश्यात कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल घेतात. रत्नागिरीत देवूड पिंपळवाडी येथे  कॉलेजला जायचा कंटाळा येतो म्हणून एका तरुणाने विषारी औषधचे प्राशन करून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमर दीपक घाणेकर(18) असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

अमर हा इयत्ता 11 वी चा विद्यार्थी होता. तो जाकादेवी हायस्कुल मध्ये शिकत होता.कॉलेजला जायचा कंटाळा येतो म्हणून 21 ऑक्टोबर रोजी अमरने रागाच्या भरात येऊन विषारी औषधाचं प्राशन केलं. त्याला तातडीनं रत्नागिरीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला केईएम रुग्णालय मुंबईत हलविले. 

नंतर त्याला पुन्हा 9 नोव्हेंबर रोजी रत्नागिरीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.नंतर त्याला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचाराधीन असताना त्याची प्राण ज्योत मालवली. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची नोंद केली असून रत्नागिरी पोलीस अधिक तपास करत आहे. 




Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments