Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राऊत हे मातोश्रीला सुरुंग लावणारा विषारी प्राणी : नारायण राणे

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2023 (21:56 IST)
माझा इतिहास शिवसेना घडविण्यामध्ये आहे. शिवसेना संपविण्यामध्ये नाही, असे स्पष्ट करत संजय राऊत हे शिवसेना वाढविणारे नाहीत तर संपवणारे आहेत. राऊत हे मातोश्रीला सुरुंग लावणारा विषारी प्राणी आहे अशी जळजळीत टीका भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  येथे केली.
 
माझ्या वाटेला येऊ नका. माझी सुरक्षा सोडून मी तुम्ही सांगाल तेथे यायला तयार आहे, असे आव्हान राणे यांनी राऊत यांना दिले. एवढेच नव्हे तर संजय राऊत हे राज्यसभेत असताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलायचे ते शिवसेना पक्षप्रमुखांना भेटून सांगणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
गेल्या दोन दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. राणे यांनी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना आपण त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. तर हिंमत असेल तर पोलीस संरक्षण सोडून समोरासमोर येण्याचे आव्हान राऊत यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे आमदार राम कदम हे  लोकांना काशीला घेऊन जात आहेत. ते पवित्र काम करीत आहेत. आता रामाचे कार्य असताना येथे रावणाचे काय काम आहे, असा टोला लगावत त्यांनी राऊत यांच्यावर संताप व्यक्त केला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments