असे सांगितले जात आहे की एनसीबीला छाप्यात मोठ्या प्रमाणात चरस, कोकेन आणि एमडी सापडला आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याला जात होती आणि एनसीबी टीमचे सदस्य यात प्रवासी म्हणून चढले होते
महाराष्ट्रात, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत क्रूझवर छापा टाकून 10 जणांना अटक केली आहे. एका मोठ्या बॉलिवूड स्टारचा मुलगाही यात सहभागी असल्याचे वृत्त आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर रेव्ह पार्टी होत होती आणि एनसीबीने आरोपीला रंगेहाथ पकडले. असे सांगितले जात आहे की एनसीबीला छाप्यात मोठ्या प्रमाणात चरस, कोकेन आणि एमडी सापडला आहे. पकडलेल्या सर्वांना रविवारी मुंबईत आणले जाईल.
NCB मुंबई झोनल डायरेक्टर यांनी सांगितले की, 'आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. तपास सुरू आहे. ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. आम्ही आठ ते दहा लोकांची चाचणी घेत आहोत. जेव्हा डायरेक्टर यांना विचारण्यात आले की पार्टीमध्ये कोणी सेलिब्रिटी उपस्थित होते का? तर ते म्हणाले 'मी त्यावर भाष्य करू शकत नाही.'एनसीबी अधिकाऱ्यांच्या मते, प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांच्या मुलांच्या सहभागाची चौकशी केली जात आहे.
<
#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday
— ANI (@ANI) October 2, 2021
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार ऑपरेशन करण्यात आले आहे , झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ऑपरेशन केले होते. ते टीमसोबत क्रूझवर चढले होते. जेव्हा क्रूझ समुद्राच्या मध्यभागी पोहोचली तेव्हा पार्टी सुरू झाली आणि यासह NCB देखील सक्रिय झाले.
असे सांगितले जात आहे की पार्टी सुरू होताच NCB च्या टीमने ऑपरेशन सुरू केले. पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. क्रूझवर छापा टाकून प्रथमच एनसीबीने अशी कारवाई केली आहे. असेही म्हटले जात आहे की क्रूझची अलीकडेच ओपनींग झाली होती आणि काही स्टार्सनी या पार्टीमध्ये परफॉर्मन्सही दिले होते. आरोपींना रविवारी मुंबईत आणले जाईल.
आजच्या कारवाईच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी पाच कोटी एफेड्रिन पकडले गेले , एनसीबीने एका रॅकेटचा पर्दाफाश केला आणि सुमारे पाच कोटी रुपयांची इफेड्रिन ड्रग्स जप्त केली. हे रॅकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये गाद्यांमध्ये लपवून ड्रग्स पाठवत असे. हैदराबादहून आलेले गाद्यांचे पॅक मुंबई विमानतळावरून ऑस्ट्रेलियात पाठवायचे होते, परंतु एनसीबीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. गाद्यांची तपासणी घेत असता, त्यात 4 किलो 600 ग्रॅम इफेड्रीन सापडले.