rashifal-2026

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक लसीकरणाची नोंद

Webdunia
गुरूवार, 24 जून 2021 (09:43 IST)
ज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाविरोधी लसीकरणास सुरुवात झाली असतानाच लसीकरण मोहिमेचा वेगही वाढला आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे बुधवारी ही रेकॉर्डब्रेक लसीकरणाची नोंद राज्यात झाली आहे. यामुळे एका मिनिटाला ४०० हून अधिक नागरिकांनी राज्यात लस घेतली आहे. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कौतुक केले आहे.  एकाच दिवशी राज्यात ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता.
 
राज्यातील कोरोनाविरोधी लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ब्रह्मोस अभियंता निशांत अग्रवाल यांची सात वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

नागपुरात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एनएचएम महिला कार्यकर्त्याने केली इच्छामरणची मागणी

१५ डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासह ठाण्यातील विकासकामांना गती मिळेल- मंत्री प्रताप सरनाईक

पाकिस्तानी आणि अफगाण सैनिकांमध्ये पुन्हा चकमक, सीमेवर जोरदार गोळीबार सुरू

पुढील लेख
Show comments