Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करणार

uday samant
, मंगळवार, 19 जुलै 2022 (21:40 IST)
राज्यात लवकरच रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी ही माहिती दिली. 
 
शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेना साथ दिली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांवर सडकून टीका  केली. गुलाबराव पाटील यांची पानपट्टीवाला, तर संदीपान भुमरे यांचा वॉचमॅन असा उल्लेख करत टीका केली होती. तर वेश्या अशीही टीका केली. ही टीका एकनाथ शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली.  त्यामुळे आता रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनेसोबत पानवाला, वॉचमन, तसच वेश्याव्यवसाय करणा-यांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना केली जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिलीय.
 
"शिंदे गटावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आलीय. रिक्शावाला, पाणीवाला,वाचमन, वैशा व्यवसाय, असे बोलण्यात आले. ती टिका जिव्हारी लागली त्याचे उत्तर आम्ही या सर्व घटाकांसाठी मंडळ काढून या घटकांचा विकास करणार आहोत", अशी घोषणा सामंतांनी केली.
 
"पाहिले रिक्शा चालकमालक व  टैक्सीचालकमालक संघटना कल्याणकारी मंडल स्थापना करणार. राज्यात जवळपास साडेआठ लाख रिक्शा तर एक लाख तीस हजार टैक्सी आहेत त्या सर्वान यात सामिल करणार आहोत. या माध्यमतून अनेक पद्धतिची मदत आम्ही देणार आहोत. या माध्यमातून मुलांच्या शिक्षणसाठी,  महिलांच्या प्रसूतिसाठी आर्थिक मदत, 60 वर्षवरील लोकाना पेन्शन, नविन वाहन घेण्यासाठी आर्थिक मदत, इन्शुरन्स आणि इस्पितल मदत मिळणार असल्याचंही सामंतांनी नमूद केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करा, विशेष मोहीम सुरु