Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सैराटची आर्ची परीक्षेला चाहत्यांची तुफान गर्दी

rinku rajguru
, शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:10 IST)
सैराट या मराठी  चित्रपटातून  सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू एका रात्रीत स्टार कलाकार झाली. आज सुद्धा ती आर्ची या नावाने ओळखली जाते आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत असून, तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे परीक्षा केंद्राला जत्रेचे रूप आले होते. तिची लोकप्रियता, तिला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली. जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे ठाऊक असल्यामुळे कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. आर्चीची जादू अजूनही कायम असल्याचे दिसून येत असून रिंकूला अजून पुढील इतर पेपर सुद्धा देणे आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च