दि. ५/१२/२०२४ रोजी आझाद मैदान आतील बाजूस “शपथविधी सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. सदर शपथविधीकरिता बहुसंख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता नमूद वाहतूक बदल हे दि. ५/१२/२०२४ रोजी सकाळी १२ ते कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहतील. pic.twitter.com/DDCMSexjDM
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 4, 2024 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष मुंबई पोलिस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली किमान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, 15 पोलिस उपायुक्त आणि 29 सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. तसेच वाढीव सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून, राज्य राखीव पोलीस दल (SRPF), द्रुत प्रतिक्रिया पथके, दंगल नियंत्रण पथके, डेल्टा, लढाऊ आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथके यासारख्या विशेष तुकड्याही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहे. ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांची नजर राहणार आहे. साध्या वेशातील अधिकारी जनतेमध्ये उपस्थित राहतील जेणे करून त्यांना कोणताही त्रास होऊ नये. एका अधिकारींनी सांगितले की, शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांसह 280 कर्मचारी सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करतील. काही मार्गांवरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. आझाद मैदानात वाहनांसाठी पार्किंगची सोय असणार नाही. तसेच कार्यक्रमाच्या आजूबाजूचे रस्ते बंद केले जाऊ शकतात. त्यामुळे लोकांनी घटनास्थळी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक विशेषत: लोकल गाड्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.