Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी दिली कौतुकाची दाद

Webdunia
मंगळवार, 9 मार्च 2021 (16:09 IST)
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीसयांना गाण्याचा छंद आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. नुकतेच अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे त्यांनी महिला दिनाच्या दिवशी शेअर केले आहे. या गाण्याचा गीतकार डॉ. स्वप्ना असून गाण्याला चाल रोहन रोहनने दिली आहे.
 
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,'काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!'

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments