rashifal-2026

फेसबुक पोस्टवरून रोहित पवार यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका

Webdunia
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (09:53 IST)
“आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडे आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादलादेखील भेट देणार आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. अहमदाबाच्या रोडवर डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली काढली जाणार आहे. या रोडलगत काही भागात झोपड्या आहेत. त्या झोपड्या दिसू नये म्हणून अहमदाबाद महापालिका 600 मीटर उंचीच्या भींत उभारत आहे.
 
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडं आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही. उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचीच ही झलक अवश्य पहा, असं फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: पीएमएफएमई योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात 250 प्रकल्प राबवले

मेधा सोमय्या मानहानी खटला प्रकरणात सत्र न्यायालयाने संजय राऊत यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला

SCO vs NEP : नेपाळने स्कॉटलंडला पराभूत करून विश्वचषक मोहिमेचा शेवट विजयाने केला

राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरोरा यांचे नाव वेगाने पुढे

नागपुरात दुर्दैवी अपघात कारने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला

पुढील लेख
Show comments