Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अलिबागेतील बाईक ऑन रेंटचा व्यवसायिकांना आरटीओची नोटीस.अनधिकृत व्यवसाय बंद करण्याची दिली सूचना

Webdunia
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (20:24 IST)
अलिबाग शहरात सुरू असलेल्या ‘बाईक ऑन रेंट’ च्या व्यवसायिकांना पेण येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी नोटीस बजावली. सदर व्यवसाय बंद करण्याची सूचना या नोटीस ने दिल्या आहेत.
 
अलिबाग शहरात गेल्या काही महिन्यांपासून ‘बाईक ऑन रेंट’ हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मात्र, बाईक ऑन रेंट या व्यवसायाविरोधात अलिबाग ऑटो रिक्षा व्यावसायिकांनी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली.
 
अलिबाग शहरात गेल्या काही महिन्यांपासून ‘बाईक ऑन रेंट’ हा व्यवसाय सुरू झाला आहे. सदर दुकानात मोटारसायकल येणार्‍या पर्यटकांना भाड्याने दिली जातात. सदर व्यावसायिकांनी कुठूनही कसले परवानेसुद्धा काढलेले नसून सदरचा व्यवसाय हा आमच्या अनधिकृत असल्याचे रिक्षा चालक संघटनेने म्हटले होते..
 
या व्यवसायामुळे रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला असून, सद्यःस्थितीनुसार आम्हास आमचे कर्जसुद्धा फेडता येत नाही. एवढेच नव्हे तर, कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा भागविता येत नाही. तरी सदर प्रकारचे चालणारे अनधिकृत व्यवसाय आपल्यातर्फे पाहणी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून बंद करण्यात यावी, जेणे करून रिक्षा व्यवसाय व्यवस्थितपणे चालेल अशी मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पेण येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महेश देवकाते यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments