Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं - संजय राऊत

Webdunia
रविवार, 12 डिसेंबर 2021 (12:25 IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचा पत्रकार सुधीर भोंगळे यांनी संपादित केलेला संग्रह  प्रकाशित झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाषणादरम्यान राजकीय टोलेबाजी केली.
या संग्रहाचं मुखपृष्ठ भगव्या रंगाचं असल्यानं, तो धागा पकडत संजय राऊत हे पवारांना उद्देशून म्हणाले, "तुमच्या विचारांना भगवं कव्हर घातलं आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एकचि झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आहे, त्याला आपण निर्माण केला आहे, त्याला आपण भगवं कव्हर घातलं."
राऊतांच्या या टोलेबाजीनंतर सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी संजय राऊत यांनी नवी दिल्लीत संसदेबाहेर खासदारांच्या निदर्शनस्थळी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची का आणून दिली, यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यांना तो प्रश्न पडलाय, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
दरम्यान, "भाजपाला देशाचं ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळलं," असा टोला राऊतांनी पवारांच्या एका भाषणाचा संदर्भ देत भाजपला लगावला.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments