Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईबाबा चरणी चक्क ३२ कोटींच्या दोन इमारती अर्पण

Webdunia
विराराच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील  दोन इमारती साईबाबा संस्थानाला चक्क देणगी म्हणून अर्पण केल्या आहेत. या दोन इमारतींची किंमत ३२ कोटी रूपयांहून अधिक असून साईबाबा चरणी अर्पण झालेली आजवरची ही आलेली दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी देणगी आहे.
 
पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण ९७८२.४४ चौरस मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरुवारी साईचरणी अर्पण केल्या. या इमारतींची सरकारी दराप्रमाणे किंमत ३२ कोटी २७ लाख १३ हजार रुपये आहे. या दानपत्रासाठीचे १ कोटी ६३ लाख रुपये इतके नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संस्थानने भरले आहे.
 
डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानाचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरु करणार आहे. या ओम साईधाम मंदिर ट्रस्टने शिर्डीला येणाऱ्या पदयात्रींसाठी शिर्डीजवळ २००८ मध्ये साईपालखी निवारा उभारला आहे. याठिकाणी पदयात्रींना निवास आणि भोजनाची मोफत सेवा पुरवण्यात येते.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी! शपथविधीची तारीख उघड! मुख्यमंत्र्यांचे नावही आली आले

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 2 मजुरांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

LIVE: भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

पुढील लेख
Show comments