Dharma Sangrah

आमच्या कामांमुळे आमचा विजय - पाटील

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (14:47 IST)
मागच्या काळात केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारने केलेल्या कामांना दाद देत लातूर जिल्ह्यातल्या मतदारांनी जिल्हा परिषदेत परिवर्तन केलं. भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली मेहनतही याला कारणीभूत आहे. लातुरात एककेंद्री सत्ता होती. आता प्रत्येकाला बोलण्याचा वाव मिळतो आहे यामुळेच जिल्हा परिषदेत आम्हाला यश मिळालं असा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी  पत्रकार परिषदेत केला. 
 
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असेल याबद्दल उत्सुकता आहे. याबद्दल विचारणा केली असता, पूर्वी बोलल्याप्रमाणे शेतकरीच असेल, अनुभवी असेल आणि उच्च विद्याविभूषित असेल असं ते म्हणाले. रामचंद्र तिरुकेंना संधी मिळेल का असे विचारले असता हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, सोशल मिडीयावर जी चर्चा सुरु आहे त्यानुसार अध्यक्ष कसा ठरेल असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता, त्याला मतदारांनीच चोख उत्तर दिले, मार्च अखेर नव्याने निवडून आलेल्या नगरपरिषद आणि जिल्हा परिषद सदस्यांची चार दिवसांची कार्यशाळा घेतली जाईल. यात लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे याबाबत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करतील. कॉंग्रेसची एककेंद्री सत्ता लोकांनी नाकारली आहे. प्रचाराच्या काळात विरोधकांनी बालक मंत्री अशी संभावना केली. पण बालकही नको अन पालकही नको मी फक्त सेवक आहे अशी कोटी पाटील यांनी केली. 
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतान तुलनेचा वादावरून पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

LIVE: पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments