Marathi Biodata Maker

न्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:39 IST)

सांगली येथे अनिकेत कोथले हत्याकांड झाले आहे. हे सर्व होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणाचा  सीआयडी सुरु असून अजूनतरी  तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला आहे.  पोलिसांनी दोघांना  ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी  सीबीआयकडे द्यावी  मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव.

दोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते.  मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात  अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे महानगरपालिका निवडणूक: तुरुंगात बंद असलेले गुंड बंडू आंदेकरचे दोन नातेवाईक विजयी

LIVE: बीएमसी पराभवानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

नागपुरात एटीएसची मोठी कारवाई, छंगूर बाबाच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक

गोव्यात दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या, एकाला अटक

हार मानू नका, धैर्याने पुढे चला, बीएमसी पराभवानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments