Marathi Biodata Maker

Sangali : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Webdunia
रविवार, 18 जून 2023 (12:16 IST)
सांगली शहरात गोळ्या झाडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलेट वरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एकाच वेळी आठ गोळ्या झाडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या केली. नालसाब मुल्ला असे या मयत कार्यकर्त्याचे नाव आहे. 

सदर घटना रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. मुल्ला हे काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी ते आपल्या घराच्या जवळ बसलेले असता दोन अज्ञात हल्लेखोऱ्यानी शिवीगाळ करत त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे. 

नासलाब मुल्ला यांची  पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले होते. घराच्या जवळ बसले असता त्यांच्या वर आठ गोळ्या झाडण्यात आल्या त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांचा मृत्यू झाला. हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पूर्व वैमनस्यातून हे घडण्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबंस्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगली शहर हादरले आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

तामिळनाडूतील २३४ आणि पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा जागा, तर महाराष्ट्रातील दोन आणि गुजरातमधील एका जागेसाठी आज मतदान

महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणूक २०२६: बारामती आणि राहुरीमध्ये आज मतदान

LIVE: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

LIVE: नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात चोरी

अभिषेक शर्माने एका मोठ्या शतकासह ऑरेंज कॅप पटकावली

पुढील लेख
Show comments