Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली

मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली
Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (14:57 IST)
सांगली: मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल अपरिहार्य बनला. पण तोच आता पालकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.
 
सोमवारी मानसिक आरोग्य दिनी मोहिमेची सुरुवात झाली असून आता   माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाईलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. यातून मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची निश्चित संख्या व व्यसनाचे गांभीर्य स्पष्ट होणार आहे.
 
मोबाईलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाईल. शिक्षक प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, जनजागृती आदी उपक्रम वर्षभर राबविले जातील. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चाैगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, माधुरी गुरव, पोपट मलगुंडे, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, मानसतज्ज्ञ क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील, सूरज कदम, प्रियांका सरतापे, वसुंधरा पाटील, कालिदास पाटील यांचा सहभाग असेल.
 
याच्या होतील नोंदी -
- मुलांचा मोबाईलमध्ये जाणारा वेळ
- पाहिली जाणारी संकेतस्थळे
- अभ्यासाव्यतिरिक्त होणारा वापर
- कार्टून, मनोरंजन, संशोधन व आक्षेपार्ह माहितीसाठी वापर
- मोबाईल वापरात पालकांचा होणारा हस्तक्षेप
- मोबाईल बंद केल्यास वागणुकीत होणारे बदल
 
८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा -
कालिदास पाटील यांच्या ‘सुश्रुषा’ संस्थेने जिल्ह्यातील १५ वर्षांपर्यतच्या ८ हजार ८९२ मुला-मुलींचे मोबाईलच्या दृष्टीने मानसशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यातून ८५ टक्के मुलांत चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये टोकाचा संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये अतिचंचलता आढळली.
 
 
Edited By- Ratandeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

पुणे पोर्श अपघात प्रकरणात दोन पोलिसांना बडतर्फ करण्याची पोलीस आयुक्तांची मागणी

LIVE: औरंगजेबाच्या कबरीचा 'संरक्षित स्मारक'चा दर्जा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे यांनी मुंडे-धस यांच्यावर निशाणा साधला

नागपूरमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडून मुस्लिमांना 'सौगत-ए-मोदी' किट चे वाटप

औरंगजेबाच्या कबरीचा 'संरक्षित स्मारक'चा दर्जा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

पुढील लेख
Show comments