Festival Posters

नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न - संग्राम कोते पाटील

Webdunia
रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (09:47 IST)
नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादू पाहत आहे, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे निव्वळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करतात, कृती मात्र शून्यच असते, अशी टीका कोते पाटील यांनी यावेळी केली. 
 
नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून धर्मशिक्षण, कुलगुरुंना अमर्याद अधिकार देणे, असे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासंदर्भात चर्चेचा केवळ फार्स केला गेला. परंतु ठराविक विचारसरणी लादण्याचा प्रयत्न सुरूच असल्याचे कोते पाटील यांनी सांगितले. 
 
ऑनलाइन प्रवेश, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, विद्यापीठ उपकेंद्र सुरू करणे, स्पर्धा परिक्षांसाठी भरती प्रक्रियेला विलंब याबाबतीत राज्य सरकार केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी नाराज आहेत. मराठा मोर्चाचा रेटा पाहून काही अटींवर 'ईबीसी' सवलतींचा निर्णय घेतला. परंतु, त्याचे श्रेय सरकारने घेण्याचा प्रयत्न करू नये, ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही केली होती, असे कोते पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

RCB vs GT : क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी, प्लेइंग ११ जाणून घ्या

LIVE: धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून खळबळजनक हत्या

धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची चाकू भोसकून हत्या

बायकुला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सैफ मस्तानला अटक

GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे

पुढील लेख
Show comments