rashifal-2026

तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – संग्राम कोते पाटील

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (17:30 IST)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा बुलढाणा येथे संपन्न

राज्यभरातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडवण्यास हालचाली केल्या नाही तर राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील  पाटील यांनी दिला. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर मेळावा काल संध्याकाळी #बुलढाणा येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
 

बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या या मेळाव्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यातील बेरोजगार तरुणांचे असंख्य प्रश्न घेऊन येत्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्चे राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली जात आहे. सर्वसामान्य घरातील तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. युवक वर्गच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

"माहित नाही की एखादा पुरूष कधी बलात्कार करू शकतो, म्हणून सर्व पुरूषांना तुरुंगात टाकावे का?"

BMC Election 2026 : 'स्पीडब्रेकर' आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे 'ग्रहण' लावणार!

मुंबईचा ‘मराठी टक्का' आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

पुण्यात निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांचा ताफा थांबवावा लागला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ठाकरे बंधूंचे आव्हान: 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र,' भाजप आणि मराठी जनतेवर टीका

पुढील लेख
Show comments