Festival Posters

संजय राऊतांना इडीकडून पुन्हा झटका

Webdunia
शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:35 IST)
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय राऊत यांना ईडीने जामीन देण्यास विरोध केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ईडीने उत्तर दाखल केले आहे.
 
ईडी तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा राऊत यांनी विशेष न्यायालयामध्ये केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयामध्ये सादर केला होता. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. परंतु, पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट सांगितले होते.
 
त्यावर ईडीच्यावतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील सर्वात मोठे सभागृह ठाण्यात बांधले जाणार

मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे एसआरपीएफ जवानाची हत्या

इराणने अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा आणि वैमानिकाला पकडल्याचा दावा केला

सीबीआयने महाराष्ट्रातील एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक नेटवर्कचा पर्दाफाश केला

अबू धाबीमध्ये ढिगाऱ्याचा तुकडा पडला, ५ भारतीयांसह १२ जण जखमी, हवाई संरक्षण दलाने हल्ला हाणून पाडला

पुढील लेख
Show comments