राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींचा राजीनामा मागितला आहे. तसेच त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ;छत्रपती शिवाजी हे जुन्या काळातील आदर्श ' असं वक्तव्य करणे चुकीचे असून हा शिवरायांचा अपमान आहे असे ते म्हणाले.
कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं.
ते म्हणाले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे."
"मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
"शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील," असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विधानावर भाजपला प्रतिक्रिया देण्यासाठी सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गप्प का त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली..एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले.
छत्रपती शिवाजमहाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला !!!
जय महाराष्ट्र!
कोश्यारी यांच्या वरील वक्तव्याचा निषेध करत शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा बदला घेण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.