Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत पुन्हा एकदा केंद्रीय मंत्र्यावर टीका करताना अपशब्द वापरला

Webdunia
सोमवार, 9 जानेवारी 2023 (08:32 IST)
संजय राऊत  हे टीका करताना अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्र्यावर टीका करताना अपशब्द वापरला आणि भाजपच्या निशाण्यावर आले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा एका व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताना दिसतात. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आम्ही अनेकदा या मुद्द्यावर लढत आलो आहोत. मात्र, जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत, ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? एखद्या तरी केंद्रीय मंत्र्याने या विषयावर राजीनामा देऊन महाराष्ट्रात यावे. जो हा अपमान सहन करत आहे, तो **ची अवलाद आहेत." अशा भाषेत टीका केली.
 
पुढे ते म्हणाले की, "मी असे मानतो की देशात संविधान न्याय आणि कायदा जिवंत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या राजकीय दबावापोटी महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार घडवले आहे, हा डाव नक्कीच उधळला जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि न्यायव्यवस्था जिवंत आहे, याच्यावर देशातील जनतेचा विश्वास बसेल. शिवसेनाही एकच असून ती संघटितच आहे. ६० वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेबरोबर आम्ही सोबत आहोत. २० ते २५ लोकं आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असून ते गेल्याने पक्षात फूट पडेल असे होत नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री! महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार, हा मुख्यमंत्र्यांचा नवा फॉर्म्युला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून लोकांची मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना

कॅबिनेट मध्ये दिसणार नवे चेहरे, 30 तारखेला होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

पुढील लेख
Show comments