Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल,असे संजय राऊत

sanjay raut
, शनिवार, 17 डिसेंबर 2022 (15:03 IST)
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी  पक्षही 'माफी मांगो' आंदोलन करत आहे. यातच भाजपच्या माफी मांगो आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. "एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल... -
यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, "भाजप आंदोलन करत आहे? कसलं? आम्ही महाराष्ट्रप्रेमी म्हणून रस्त्यावर उतरलोय म्हणून भाजप आंदोन करतय का? एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल. आज, आपण बघत आसाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्याबद्दल आणि महात्मा फुले यांचा अपमान झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरली आहे. खरं म्हणजे भाजपने, महाराष्ट्राच्या मुंख्यमंत्र्यांनीही रस्त्यावर उतरायला हवे. ते आम्हाला आडवतायत. इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नसेल."
 
यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू -
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. ही माहिती चुकीची आहे का? यांची डोकी तपासायला पाहीजे. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. ते वळवळत असतात सारखे." एवढेच नाही तर, सरकार आपली मागणी पूर्ण करेल का, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, "सरकारने आमची मागणी पूर्ण करो अथवा न करो. ही महाराष्ट्राची शक्ती आहे. ती दिल्लीला दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे. महाराष्ट्रात म्हणतात निर्लज्ज सरकार. या सरकारमध्ये दम नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान होऊन, जे राज्यपालांना हटवत नाही. त्यांच्यावर काय बोलणार? जनता उत्तर देईल," असेही राऊत यावेळी म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूरमधील बीएस्सीची विद्यार्थिनी प्रिया पाटील राज्याची सदिच्छा दूत