Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सातारा: डॉल्बीच्या तालावर ठेका धरत उदयनराजे यांचे प्रशासनाला चॅलेंज

udyan raje bhosale
, सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (15:39 IST)
भाजप खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांना अनेकदा टीकेलाही समोर जावं लागत. त्यांनी साताऱ्यात जे काही केलं त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. सध्या साताऱ्यात डॉल्बी साउंडला वापरण्यास बंदी आहे. खासदार साताऱ्याचे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा डॉल्बी सिस्टीमच्या उदघाटनाची आले होते. त्यावेळी त्यांनी कॉलर उडवून डॉल्बी साउंड सिस्टीमवर ठेका धरून प्रशासनाला ओपन चॅलेंज केले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे डॉल्बी चालक आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. साताऱ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात डॉल्बी का वाजू नये, याचे प्रशासनासह पोलिसांनी उत्तर द्यावे, असा रोखठोक सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.आता कॉलर उडवून डॉल्बीवर बंदी असताना एका कार्यकर्त्याच्या डॉल्बी सिस्टीमचे उदघाटन करताना उदयनराजे डॉल्बीवर उदयनराजेंसाठी तयार विशिष्ट गाण्यावर  ठेका धरत कॉलर उडवत प्रशासनाला ओपन चॅलेंज दिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 7 रुपयांची वाढ