Marathi Biodata Maker

विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

Webdunia
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (15:11 IST)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला होता. पण विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळण्यात आला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमात बसत नसल्याचं सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र हा प्रस्ताव मांडण्यासाठी भाजपनं कामकाज सुरू झाल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र 'भाजपप्रणित केंद्र सरकारनं सावरकरांना भारतरत्न जाहीर करावा त्यानंतर राज्य सरकार पंतप्रधान मोदी आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार,' असल्याचा टोला संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी लगावला. 
 
'राज्य, देश उभारणीत ज्या महान व्यक्तींचं मोलाचं योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कुणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचं काही काम नाही. सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही.' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सावरकरांचा पहिलाच स्मृती दिन नाही. त्यामुळेच आता प्रस्ताव का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तामिळनाडूतील शिवगंगा येथे दोन बसची धडक; अपघातात 11 जणांचा मृत्यू

LIVE: गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

नागरी निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगावर नाराज

LPG गॅस सिलिंडर स्वस्त झाला

"खरे मारेकरी संसदेत बसले आहे" असे म्हणत काँग्रेस खासदार भवन संकुलात कुत्रा घेऊन पोहोचल्या

पुढील लेख
Show comments