Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय

Webdunia
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:35 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
वेबलिंकद्वारे उपरोक्त माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे: (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. (२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. (३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे. (४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.

संबंधित माहिती

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

पुढील लेख
Show comments