Dharma Sangrah

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही : अजित पवार

Webdunia
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:16 IST)
दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अजित पवारांनी ही माहिती दिली.
 
‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’, या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटपही केले.
 
बैठकीत अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीने वागा. तसेच कोरोनाला लाईटली घेऊ नका, काहीजण हनुवटीच्या खाली मास्क लावतात, ‘नो मास्क’ च्या दंडाच्या माध्यमातून 12.5 कोटी जमा झाले आहेत. पुणेकरांनो हे बरं नाही असंही अजित पवार म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धुक्यामुळे अपघातात; १४ जणांचा मृत्यू

"आम्ही चोरी करु का?" झोपेतून उठवून परवानगी मागितली, नंतर चोरांनी वृद्ध महिलेला बांधले ६५,००० रुपये लुटले

भटिंडा येथे भीषण अपघात; गुजरातमधील एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत एअर शोची तयारी, घारींना मिळणार १,२७० किलो मांसाची मेजवानी

वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकत उल्लेखनीय कामगिरी केली; हा टप्पा गाठणारा तिसरा सर्वात जलद भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments