Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधान परिषद निवडणुकीचा निकाल 'इथे' पाहा

Webdunia
सोमवार, 20 जून 2022 (22:16 IST)
काँग्रेस आणि भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला नसल्यानं निवडणूक अत्यांत चुरशीची झाली. कारण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते.
 
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार निवडणूक लढत होते.
 
विजयी उमेदवार :
सचिन अहिर (शिवसेना) - विजयी
आमशा पाडवी (शिवसेना) - विजयी
भाई जगताप (काँग्रेस) -
चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) - विजयी
एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी
रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी
प्रवीण दरेकर (भाजप) - विजयी
प्रसाद लाड (भाजप) -
राम शिंदे (भाजप) - विजयी
श्रीकांत भारतीय (भाजप) - विजयी
उमा खापरे (भाजप) - विजयी
महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?
राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली गेली.
 
महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.
 
शिवसेना- 55
राष्ट्रवादी काँग्रेस- 53
काँग्रेस- 44
विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज होती.
 
महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे.
 
पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे.
 
ठाकरे सरकारकडे अपक्षांच्या जोरावर 169 आमदारांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी राज्यसभेत अपक्षांची मोट बांधण्यात मात्र उद्धव ठाकरे अपयशी ठरले होते.
विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू."
 
राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं. सरकार चालवण्यासाठी अपक्षांचा पाठिंबा असूनही राज्यसभेत अयशस्वी ठरलेले उद्धव ठाकरे विधानपरिषदेत अपक्षांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
 
भाजपकडे संख्याबळ पुरेसं आहे?
राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये.
भाजपचे सद्यस्थितीला 106 आमदार आहेत. भाजपसोबतच्या अपक्षांच्या मदतीने संख्याबळ 113 पर्यंत पोहोचतं. त्यामुळे चार भाजपचे उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात.
 
पाच उमेदवार जिंकवण्यासाठी भाजपला एकूण 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आमदारांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.
 
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी जागा लढवणं सोपं नाही हे मान्य केलंय. ते म्हणाले, "सत्तारूढ पक्षात आमदारांमध्ये असलेल्या नाराजीला वाव हवाय म्हणून आम्ही पाचवी जागा लढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला विश्वास आहे की पाचवी जागा आम्ही निवडून आणू."
 
राज्यसभा निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकली तर, भाजपला 123 मतं मिळाली होती. 12 अपक्ष आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. हे आकडे लक्षात घेतलं तरी विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी 12 मतांची गरज पडणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: नाना पटोले, अजित पवार, एकनाथ शिंदे पुढे

5 कोटींच्या आरोपावरून विनोद तावडेंवर कारवाई, राहुल-खर्गे यांना पाठवली 100 कोटींची नोटीस

20 हजारांच्या फरकाने विजयाचा दावा करत आहेत शिवसेना नेते मुरजी पटेल

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

पुढील लेख
Show comments