Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फीने सासू सुनेचा जीव घेतला, पाण्यात बुडून मृत्यू

सेल्फीने सासू सुनेचा जीव घेतला, पाण्यात बुडून मृत्यू
, शनिवार, 8 जानेवारी 2022 (17:32 IST)
सेल्फीचा नाद लागून कित्येक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तरीही सेल्फी घेण्यासाठी लोक काहीही करतात. आपल्या जीवाची पर्वाहा न करता धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी जातात. अशीच सेल्फी घेण्याची आवड एका सासू सुनेसाठी जीवघेणी ठरली आहे.  
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ भेडाघाट येथे सेल्फी घेणे मुंबईहून भेटायला आलेल्या महिलेसाठी आणि तिच्या भावी सूनेसाठी जीवघेणे ठरले. नवीन भेडाघाटच्या खडकावरून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला आणि दोघेही नदीत पडले. अपघातानंतर स्थानिक पोहणाऱ्यांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मुलीचा शोध अद्याप सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर, मुंबई येथे राहणारे अरविंद सोनी त्यांची पत्नी हंसा सोनी (वय 50) आणि मुलगा राज (वय 23) यांच्यासोबत भेडाघाटला भेट देण्यासाठी आले होते. राजचे लग्न रिद्धी पिछड़ियाशी (वय 22) होणार होते. त्याही सोनी कुटुंबासोबत पर्यटनासाठी भेडाघाट येथे गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता हे चौघे रोपवेने नवीन भेडाघाट येथे पोहोचले. यादरम्यान हंसा आणि रिद्धी मोबाईलमध्ये टायमिंग सेट करून फोटो काढण्यासाठी खडकावर उभ्या होत्या. यादरम्यान दोघांचाही तोल गेला आणि दोघेही नर्मदेत पडले. प्रवाह जोरदार होता, त्यामुळे त्यांना थोडा वेळ काहीच कळले नाही. हंसा सोनी यांचा मृतदेह स्थानिक जलतरणपटूंनी बाहेर काढला आहे. शनिवारी सकाळी पुन्हा मुलीचा शोध सुरू झाला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत ऑक्सिजन बेडवर दाखल झालेल्या ९६ टक्के रुग्णांनी लस घेतली नाही