Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

Webdunia
सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (08:59 IST)
महाराष्ट्रातील नांदेड काँग्रेसचे लोकसभा खासदार वसंत चव्हाण यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. तसेच त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना हैदराबाद येथील क्रीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना  श्वास घेण्यास त्रास होत होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
तसेच वसंत चव्हाण 2009 मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. तसेच यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश करण्यापूर्वी मे महिन्यातच त्यांची लोकलेखा समितीवर नियुक्ती झाली.
 
2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नायगाव मतदारसंघातून विजय मिळवला होता. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून  विजयी झाले होते.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments