Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर खळबळजनक विधान

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर खळबळजनक विधान
Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (16:52 IST)
ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्रीवर पोहोचले.आणि उद्धव ठकरे यांची भेट घेतली. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. ज्याचा विश्वासघात झाला तो खरं हिंदू आहे.ज्याने जगाचा विश्वासघात केला तो खरा हिंदू नाही.स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजाना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसलेले पाहायचे आहे. 

शंकराचार्य म्हणाले, 'आम्ही हिंदू धर्म मानतो. आम्ही 'पुण्य' आणि 'पाप' मानतो. 'विश्वासघात' हे सर्वात मोठे पाप म्हटले जाते. हेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडले आहे. त्यांनी मला बोलावलं आणि मी इथे आलो.
उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. याचे आम्हाला दु:ख झाले आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमचे दु:ख दूर होणार नाही.
 
दिल्लीत केदारनाथ धाम बांधण्याच्या प्रश्नावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, 'प्रतिकात्मक केदारनाथ बांधता येणार नाही. बारा ज्योतिर्लिंगे विहित आहेत. त्याची जागा निश्चित आहे. हे चुकीचे आहे.पुराणात देखील म्हटले आहे, 'केदारं हीम पृष्ठे ' मग दिल्लीत केदारनाथ कसे नेणार? ते म्हणाले, आमच्या मंदिरात राजकारणी येत आहेत. केदारनाथमध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा झाला होता. त्याची कोणालाच पर्वा नाही. 
 
अनंत अंबानींच्या लग्नात पंतप्रधान मोदींना दिलेल्या आशीर्वादाच्या प्रश्नावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे आशीर्वाद घेतले, आम्ही त्यांना दिले. ते आमचे शत्रू नाहीत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे. 

Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर संशय घेऊन स्वतःच्या मुलाची केली हत्या

LIVE: दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा दावा

अजित पवारांनी मुस्लिमांबाबत केलेल्या विधानावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली समोर

‘उद्धव ठाकरेंनी मला दोनदा फोन केला आणि…’, दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा दावा

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने नितीन गडकरी सन्मानित

पुढील लेख
Show comments