Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फिरायला जाण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार

Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (09:41 IST)
दारू पाजून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर घोटी व नाशिक येथे जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला व आरोपी नीलेश अर्जुन दळवी (रा. ध्रुवनगर, नाशिक) हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी नीलेश दळवी याने पीडित महिलेला फिरायला नेण्याचा बहाणा करून घोटी येथील हॉटेल विवांत रिसॉर्ट येथे नेले.
 
तेथे नेल्यानंतर दळवी याने पीडितेला तिची इच्छा नसताना बळजबरीने दारू पाजून “तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे सांगून त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडितेला “तुझे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मी ते व्हायरल करीन,” अशी धमकी देऊन आरोपी दळवी याने पीडितेला पुन्हा मुंबई नाक्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन तेथेही बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
 
या गोष्टीला विरोध केला असता आरोपी नीलेश दळवी याने पीडितेच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकी दिली. हा प्रकार जुलै 2022 पासून सुरू होता. या प्रकाराला कंटाळून पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी नीलेश अर्जुन दळवी याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी, नंदनकानन एक्स्प्रेस ट्रेनवर गोळीबार

IPS संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे DGP पदावर नियुक्ती

'महिलांनी जागे होण्याची वेळ आली आहे',करंजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल शायना एनसीने सुनील राऊतांवर टीका केली

जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख