Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या पत्रकारितेला स्व. गर्गे यांनी दिशा दिली: शरद पवार

Webdunia
लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांना स्व. स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याच्या पत्रकारितेला स्व. स. मा. गर्गे यांनी योग्य दिशा दिली. त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय ही अभिमानाची बाब आहे. आजपर्यंत ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले ते सर्वजण भारतातील मोठे पत्रकार आहेत, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी यावेळी केले. वर्तमानपत्रातील अग्रलेख हे आम्हा राजकारण्यांना दिशा देण्याचे काम करत असतात. आज अग्रलेखापेक्षा ‘पेज थ्री’ला खूप महत्त्व आले आहे. परंतू याही काळात वाचलाच पाहिजे असा अग्रलेख लोकसत्ताचा आहे. गिरीश कुबेर यांचे अग्रलेखाचे विषय आणि भाषा विचार करायला लावणारी आहे. आखाती देशात तेलाबद्दल काय होतंय, ते कुबेर यांच्यामुंळेच कळतं, असेही पवार म्हणाले.
 
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , राज्यसभा सदस्य रजनी पाटील,  आ.अमरसिंह पंडित, आ.भीमराव धोंडे, आ.आर.टी. देशमुख, आ.लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी राज्यमंत्री सुरेश धस, माजी आ.उषा दराडे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, सभापती संदिप क्षीरसागर, माहिती संचालक यशवंत भंडारे, जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर, म.रा.मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांची उपस्थिती होती.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments