Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आणि शरद पवार म्हणाले आमची पोरं काय करतील याचा नेम नाही

Webdunia
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (21:41 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोझ केला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आमची पोरं काय करतील याचा नेम नाही असं मिश्किल वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान ही घटना सांगताना शरद पवारांनाही हसू आवरता आलं नाही. पवारही मनसोक्त हसून पत्रकार मंडळी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांना किस्सा सांगत होते. शरद पवार यांनी राज्यातील घडामोडींवर मत व्यक्त केलं असून लखीमपुर घटना आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली आहे. शरद पवार यांनी सांगितले की, आमचे सर्व सहकारी आहेत त्यातील एकाची आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चिरंजीवांची आहे. जयंत पाटील यांच्या चीरंजीवांनी पॅरिसमध्ये काल रात्री आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोझ केला. त्यावर दोन्ही बाजूने होकार मिळाला आहे. त्यामुळे आता आम्ही थेट पॅरिसमध्ये पोहोचलो असून इस्लामपूरपर्यंत सिमित नाही. आम्हाला आता काळजी घ्यावी लागेल आमची मुलं कधी काय करतील त्याचा नेम नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

Maldives Row: भारतीयांच्या रोषाने घाबरलेल्या मालदीवने आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलं हे खास!

बेंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने बंगालमधून दोन प्रमुख संशयितांना ताब्यात घेतलं

विमानांत कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल!

निवडणूक नंतर मोबाइल रिचार्ज होईल महाग

नागपुरात शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या खाऊन 25 जणांना विषबाधा

राजस्थान, मध्य प्रदेशसह 23 राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल, महाराष्ट्र राज्यांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित

भाजपला मोठा धक्का,धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा, या पक्षात जाणार

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला,सात जणांचा मृत्यू

Israel Hamas War: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमास नेते इस्माईल हनीयेह यांचे मुलगे आणि नातू ठार

नीरज चोप्रा 18 जून रोजी पावो नुर्मी गेम्समध्ये भाग घेणार

पुढील लेख
Show comments