शरद पवार यांनी सरकारवर दबावाचा वापर करुन लोकप्रतिनिधींना पक्षात घेत असल्याचा आरोप केले होता. त्याला उत्तर देताना पडणवीस यांनी पवार यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला दिला. या वेळी बोलताना ते म्हणाले आम्हाला कोणावर कसालाही दबाव टाकून पक्षात घेण्याची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सोबतच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच भाजपच्या संपर्कात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शरद पवारांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. ज्या लोकांवर ईडीची चौकशी सुरु आहे अशांना पक्षात प्रवेश मिळणार नसून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नेते राहण्यास का तयार नाही याचे आत्मचिंतन शरद पवार यांनी स्वत: करावे असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. शरद पवारांच्या पार्टीत नेते का राहण्यास तयार नाही याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. भाजपाची अवस्था आता पहिल्यासारखी राहिली नाही. लोकांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांनी भाजपाला प्रचंड प्रमाणात यश दिलं आहे. त्यामुळे आता कोणावर दबाव टाकून लोकं आपल्या पक्षात घ्यावी अशी अवस्था भाजपाची नाही असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.