Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ना राफेलची कागदपत्रे सांभाळता येत नाहीत, ते देश काय सांभाळणार? - शरद पवार

Webdunia
परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर स्टेडियम मैदान, परभणी येथे एक जंगी सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
 
“पाच वर्ष ज्यांनी देशाचा कारभार संभाळला त्यांनी दलित, आदिवासी, मराठा, धनगर, मुस्लिम अशा अनेक समाजांना तसेच देशातील तरुणांना फसवण्याचे काम केले आहे. त्यामुळेच या मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे,” असे मत या वेळी पवार यांनी व्यक्त केले.
 
आपण सर्वजण काळ्या आईच्या कुशीत वाढलो. या देशातील सव्वाशे कोटींची भूक मिटवणारा बळीराजा जेव्हा कर्जाच्या संकटात होता, तेव्हा आम्ही सत्तेत असताना पंतप्रधानांशी चर्चा करुन ७० हजार कोटींचे कर्ज माफ करून बळीराजाला अनेक सवलती मिळवून दिल्या. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केवळ भाषणे देत आले आहे. देशाच्या बळीराजावर असलेले संकट दूर करण्याची आजच्या सत्ताधाऱ्यांची भूमिकाच नाही. त्यामुळे हे सरकार घालवण्याचे काम आपण करायचे आहे, असे आवाहन पवार यांनी केले.
 
भाजप सरकारच्या काळात आरबीआय गव्हर्नरांनी तीन महिन्यांत राजीनामा दिला. देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला करण्याचे काम या सरकारने केले. आमच्या कार्यकाळात साडेतीनशे कोटीला ठरलेले राफेल विमान १६०० कोटीला खरेदी करण्याचे काम मोदींनी केले. सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांची मागणी केली असता, ते हरवल्याचे मोदी सरकारने न्यायालयात सांगितले. ज्यांना राफेलची कागदपत्रे सांभाळता आली नाहीत, ते देश काय संभाळणार, अशी टीकाही पवार यांनी केली.
 
परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी अर्ज भरल्यानंतर सभेतील उपस्थितांसमोर भावना व्यक्त केल्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments